Tuesday 19 April 2016

🎯शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )🎯
➖➖➖➖➖➖➖➖

♻१. पेपरलेस प्रशासन
♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
♻४.   दिवस नवा, भाषा नवी
♻५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
♻७.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
♻८.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
♻९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
♻१०. एक तास राष्ट्रासाठी
♻११.  भाषिक प्रयोगशाला
♻१२ .  पर्यावरण संरक्षक दल
♻१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
♻१४.  विषय खोली
♻१५. आम्ही स्वच्छता दूत
♻१६.  तंबाकूमूक्त शाळा
♻१७.  प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८.  विज्ञान भवन
♻१९.  मैत्री संख्यांची
♻२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
♻२१.  एक दिवस गावासाठी
♻२२.  विषय कोपरा - प्रभावी माध्यम
♻२३.  विशेष विद्यार्थी कोपरा
♻२४.  पुस्तक भिशी
♻२५.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
♻२६.  क्रीडा दूत
♻२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
♻२८.  हरित शाळा
♻२९.  प्रदूषण हटवा अभियान
♻३०.  चालता बोलता
♻३१. माझा मित्र परिवार
♻३२. माझे पूर्व ज्ञान
♻३३. शब्दगंगा
♻३४.  कौन बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड पॉट
♻३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
♻३७.  संख्यावरील क्रिया - एक छंद
♻३८.  प्रश्नमंजूषा
♻३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
♻४०.  बालआनंद मेळावे
♻४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२.  पुस्तक जत्रा
♻४३.  फन एंड लर्न
♻४४.  शंकापेटी
♻४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
♻४६.  रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक तास इंटरनेट
♻४८.  गांडूळ खत निर्मिती
♻४९.  Student of the day
♻५०.  एक तास मुक्त अभ्यास
♻५१. समस्या व सूचना पेटी
♻५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
♻५३.  लोकसंख्या शिक्षण
♻५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५.  वाचाल तर वाचाल
♻५६.  बिखरे मोती
♻५७.  Book of the day
♻५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
♻५९.  बालसभा
♻६०.  माझ्या गावचा इतिहास
♻६१.  परिसरातील भूरुपांची ओळख
♻६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
♻६३.  प्रयोगातून विज्ञान
♻६४.  मुक्त वाचनालय
♻६५.  खरा मित्र उपक्रम
♻६६.  गृहपाठ गट
♻६७.  टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८.  हस्तलिखित निर्मिती
♻६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
♻७०.  वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
♻७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
♻७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
♻७३.  चला शिकूया लघू़द्योग
♻७४.  दैनंदिनी लेखन
♻७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
♻७७. शालेय परसबाग
♻७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९.  खेळातून गणित शिकू
♻८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
♻८२. सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
♻८५.  परिसरातील कलांची ओळख
♻८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
♻८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
♻८९.  काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०.  पाणी व्यवस्थापन
♻९१. बलिराजा चेतना अभियान
♻९२.  जलसाक्षरता
♻९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी
♻९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
♻९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ . पुस्तक परिचय व भेट
♻९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
♻९८ . निर्मल शाळा अभियान
♻९९.  विविध दिन साजरे करणे

Friday 1 April 2016

🌺🌺उपक्रमाचे नाव :-
मराठी ट्रेन🌺🌺

 वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करावे एका गटाने नाव सांगावे दुसऱ्या गटाने सांगितलेल्या नावाच्या शेवटच्या अक्षराने सुरु होणारे नाव सांगावे अशा पद्धतीने नावाची ट्रेन सुरु ठेवावी .हा खेळ वयक्तिकही घेता येतो.यामुळे मुलांच्या शब्दसंपतीत भर पडते.
उदा:-
भारत-  तराजू - जवस - सायकल - लवकर - राजा-  जाणकार-  रंग - गणपत - तबला - लाज - जेव - वजन - नारंगी - गिरकी - कमला -  लाट - तयार - रमा - माणूस

यात पहिला शब्द म्हणजे engine व बाकीचे शब्द म्हणजे Train.अट एवढीच की कोणताही शब्द repeat होऊ  नये.
🌺🌺हाच खेळ आपण english साठी सुद्धा खेळू शकतो.🌺🌺

 🌺🌺उपक्रमाचे नाव:- English Train🌺🌺

Rat - top- parrot - teacher - red - dog goat - tiger - rain- name - egg - gun - nest -ten  -nose - engine - elephant - touch-  hen  - namste eyes .
 
   🌺छाया मुंडकर🌺
  🌴कन्या वसमत🌴

Thursday 31 March 2016

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌴उपक्रमाचे नाव ::-
शब्दखेळ🌴
     🌺🌺🌺🌺🌺
1)
'अ 'चा 'आ 'कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की ज्यात पहिले अक्षर 'अ 'कारी असेल ते अक्षर 'आ 'कारी करायचे
उदा :-
घर - घार
छन - छान
नव - नाव
पन - पान
घम - घाम
दळ - दाळ
खरा - खारा
गल - गाल
गळ - गाळ
कळा - काळा
रग - राग
बळ - बाळ
रजा - राजा
मर - मार
गर - गार
घर - घार
चर - चार
परवा - पारवा।  इ..
      🌺🌺🌺🌺🌺
2)
'अ 'काराचा 'उ 'कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की त्यातील पहिले अक्षर 'अ' कारी असेल ते अक्षर 'उ 'कारी करायचे
उदा:-
 चरा - चुरा
धनी - धुनी
कशी - कुशी
पडा - पुडा
दसरा - दुसरा
मला - मुला
पत्र - पुत्र
परी - पुरी
गण - गुण
मका - मुका
मला - मुला
सतार - सुतार
डबकी - डुबकी
बरखा - बुरखा इ.
     🌺🌺🌺🌺🌺
3)
'अ' काराचा 'ए' कार करणे
दोन अक्षरी शब्द असे घ्यायचे की त्यातील पहिले अक्षर 'अ 'कारी असेल ते' ए' कारी करायचे
उदा.
बट - बेट
नम - नेम
बल - बेल
मळा - मेळा
घरी - घेरी
वळ - वेळ
मण - मेण
कस - केस
फस - फेस
कर - केर
खप  -खेप
खळ - खेळ
टप - टेप
तल - तेल
तज - तेज
दव  -देव
शत - शेत
धनु - धेनु
भट - भेट
रशमी - रेशमी
हवा - हेवा
वणी - वेणी इ...

    🌺छाया मुंडकर🌺
🌴जि .प .के .प्रा .शा .कन्या वसमत🌴

Monday 7 March 2016

ज्ञानरचनावादी वर्ग

🔹ज्ञानरचनावादी वर्ग 🔹

ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-
▪झाकणे
▪प्रकल्पासाठी चित्र , कागद
▪तक्ते
▪वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
▪प्लास्टिक बॉक्स
▪पणत्या , सुगडे
▪रंगीत खडे
▪गारगोट्या
▪कापुस
▪लोहचुंबक
▪भिंग
▪दुर्बीण
▪सेल , बल्ब
▪सोलर पॉवर
▪छोटी मोटार
▪थर्माकोल च्या गोळया
▪लेस
▪टाचण्या
▪स्टेपलर
▪धान्य, पदार्थ नमुणे
▪पंचिंग , टोच्या, लेस
▪शेंगांची टरफले
▪पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
▪वाळलेले भोपळे
▪विविध बिया
▪डबे
▪ माऊंट बोर्ड
▪ ड्रॉइंग पेपर
▪ प्रकल्प पुस्तके
▪ चार्ट , चित्र
▪ थर्माकोल शीट
▪ फाईल
▪ फेविकॉल
▪ कटर
▪ कात्री
▪ वेल्वेट कपडा
▪ दाब पिन
▪ मार्कर पेन
▪ स्केच पेन
▪ पट्टी
▪ नोटा सत्यप्रती
▪ डिंक
▪ रंग - ब्रश
▪ चिकट टेप , रंगीत टेप
▪ वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,  
     डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
     स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
▪ गोट्या
▪ वर्तमान पत्र रद्दी
▪ स्टिकर
▪ प्लास्टर अॉफ पँरीस PUP
▪ खळ
▪ पताका कागद
▪ मार्बल पेपर
▪ काचेच्या पट्या
▪ बांगड्या
▪ बांगडीच्या काचा
▪ मेणबत्या
▪ काडेपेट्या, व काड्या
▪ खोके
▪ सुतळी , तंगुस
▪ चित्रकला वही , पुस्तक
▪ कार्यानुभव वही , पुस्तक
▪पोस्टकार्ड
▪बाभळीचे काटे
▪मोजपात्र
▪चंचुपात्र , परिक्षा नळ्या
▪ स्प्रे पंप बाटली
▪खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
▪चिमटे
▪नारळ , करवंट्या
▪कला , कार्यानुभवासाठी साहित्य
 व इतर आनुषंगिक साहित्य.

 %%%%%%%%%%%%%
१) भाषा
▪ अक्षरकार्ड
▪ शब्दकार्ड
▪ शब्दपट्टया
▪ वाक्यपट्टया
▪ स्वरचिन्हाधारीत शब्द
▪ जोडशब्द
▪ कविताफलक
▪  इंग्रजी अक्षरे
▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
 व इतर आनुषंगिक साहित्य.

&&&&&&&&&&&&&&&&
१)इंग्रजी

▪ इंग्रजी अक्षरे
▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
▪ Singular-plural
▪ Verb form
▪ Word Hanger
▪ Related words
▪ Rhyming words
▪ Synonymous
▪ Antonyms
▪ Capital-Small letters
▪ Word formation
        And some essential !
@@@@@@@@@@@@@
 
३)गणित

@संख्याकार्ड
@ अंककार्ड
@ भौमितीक आकार
@लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
@नाणी -नोटा
@घड्याळ
@चित्र स्टँम्प
@बेरीज- वजाबाकी मॉडेल
@मनी माळा
@उजळणी अंकात - शब्दात
@चिन्ह +  -  × ÷ = <  >
@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
@दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे
@वर्ग व वर्गमुळ
@ लहान-मोठे संख्या
 व इतर आनुषंगिक साहित्य.

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

Thursday 25 February 2016

वर्णनात्मक नोंदी 1ते 4

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली-मराठी)
⭕ उल्लेखनीय बाबी

1 हस्ताक्षर उत्कृष्ट आहे
2 हस्ताक्षर उत्तम आहे
3 अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे
4 वाचनात गती आहे
5 उच्चारात स्पष्टता आहे
6 भाषेची आवड आहे
7 गायनात लय आहे
8 लेखन सराव चांगला आहे
9 बोलताना आत्मविश्वासाने बोलतो
10 घटक समजून घेतो
11 शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे
12 चढ़-उतारासह वाचन करतो
13 कविता साभिनय सादर करतो
14 संवाद नाट्यिकरन करतो
15 घटक पृथक्करण करतो
16 कविता आवडिने गायन करतो
17 स्वयंलेखन करतो

सुधारना आवश्यक नोंदी

1 हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक
2 लेखनात गती आवश्यक
3 अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
4 अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
5 वाचनात गाती आवश्यक
6 उच्चारात स्पष्टता आवश्यक
7 वाचनात चढ़-उतार आवश्यक
8 गायनात लय आवश्यक
9 लेखन सराव आवश्यक
10 बोलताना आत्मविश्वासाची गरज
11 ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक
12 घटक समजून घेणे आवश्यक
13 शब्दसंपत्ति वाढ आवश्यक
14 अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
15 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक
16 गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
17 गायनाचा सराव आवश्यक
18 सरळ रेषेत लेखन आवश्यक

आवड व छंद विषयक नोंदी

1 लेखनाची आवड आहे

2 वाचनाची आवड आहे

3 कविता गायनाची आवड आहे

4 रेखाटनाची आवड आहे

5 प्रश्न सोडवण्याची आवड आहे

6 भाषेची आवड आहे

7 निबंध लेखनाची आवड आहे

8 उतारे वाचनाची आवड आहे

9 वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे

10 सुविचार वाचण्याची आवड आहे

11 परिपाठात आवडीने सहभाग घेते

12 समुहगीतांची आवड आहे

13 बड़बड़ गितांची आवड आहे

14 प्रार्थानांची आवड आहे

15 उपक्रम सहभाग आवडीने घेते

16 गटचर्चेत आवडीने सहभाग घेते

17 प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते

18 स्वाध्याय आवडीने सोडवते

19 गृहपाठ आवडीने पूर्ण करते

20 हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होते

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली - english)
special observational  notes :-

looks pictures and objects carefully
can answer oral questions
try to read pictures
uses simple conversations
can use requests
listens and acts
can repeat poem after teacher
can make group of flash cards
takes interests in linguistic activities
can communicate using simple english
improvement related notes :-


eye hand concentration needed for drawing.
speaking should be confident
participating language games must
enthusiasm needed
try to participate group activity
handling skill must be improved
concentration while listening must be improved
practice of drawing shapes is must
hobbies and interest :-


listens rhymes carefully
presents rhymes spontaneously
try to answer in linguistic activities
have interest in linguistic activities
try to understand untold orders
tries to collect pictures / flash cards
tries to handle flash cards in past time
can to draw patterns related with alphabets
try to obey instructions


वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1ली -गणित)

⭕विशेष उल्लेखनीय बाबी
1 वस्तु मोजून संख्या अचूक सांगतो
2 चित्रे मोजून संख्या अचूक सांगतो
3 सांगितलेली संख्या ऐकून लिहितो
4 संख्या पाहून लिहितो
5 1ते 9 संख्या चिन्हांचा संबोध स्पष्ट आहे
6 बेरीज वस्तू मोजून करतो
7 वजबाकी वस्तू मोजून करतो
8 पुढे मोजून बेरीज करतो
9 उभी मांडणी उदाहरणे सोडवतो
10 आडवी मांडणी उदाहरणे सोडवतो

⭕ सुधारणा आवश्यक नोंदी

1 संख्या मोजनी अचूक गरजेची
2 संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
3 वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक
4 बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
5 संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
6 तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास आवश्यक
7 लेखनात अचूकता आवश्यक
8 लेखनात गती आवश्यक


⭕आवड / छंद विषयक नोंदी
1 गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो
2 संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो
3 तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे
4 चित्रे रेखाटण्याची आवड आहे
5 भौमितीक आकाराचे रेखाटन करतो
6 भौमितीक आकारची नक्षी काढ़ते
7 संख्यालेखनाची आवड आहे
8 संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो
9 संख्यांची कलात्मक मांडणी करते
10 रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे रेखाटन करते
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - मराठी )

⭕ विशेष उल्लेखनीय नोंदी :-
कविता गायन अभिनय करते .
गाद्द्यांशाचे अभिरुचीपूर्वक वाचन करते .
अवांतर वाचनात रस घेतो .
भाषिक उपक्रमात सहभाग चांगला .
चित्र वाचन समर्पक शब्दात करते .
आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडतो .
चर्चेत सक्रिय सहभाग घेते .
अनुलेखन करते .
श्रुतलेखन करते .
हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आहे.
सुधारात्मक नोंदी :-
जोडशब्दांचे लेखन अपेक्षित .
जोडशब्दांचे वाचन अपेक्षित .
तोंडी प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे अपेक्षित .
चर्चेत सहभाग घेणे आवश्यक.
लक्ष्यपुर्वक श्रवण आवश्यक .
लेखनात स्पष्टता आवश्यक .
वाचनात गती आवश्यक .
उच्चारात स्पष्टता अपेक्षित .
हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .
आवड छंद विषयक नोंदी :-
कविता गायनाची आवड आहे .
कविता साभिनय सादरीकरणाची आवड आहे ..
गीत गायनाची आवड आहे .
भाषण करण्याची आवड आहे .
अवांतर वाचनाची आवड आहे.
गोष्टींच्या पुस्तकांची आवड आहे .
वर्तमानपत्राचे वाचन करते .
हस्ताक्षर लेखनाची आवड आहे .
स्वयंस्फूर्तीने लेखन करण्याची आवड आहे .
नाट्यीकरणाची आवड आहे.


वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री -english)

spacial remarkable points
listen rhymes carefully
listen words carefully
listen and understand content
uses welcome massages
uses simple conversations
answers simple questions orally
look at the picture and say the world
identifies words
reads story after teacher
improvemental points
should be help in group activities
should hold writing material properly
should listen carefully
should speak dearly and loudly
should handle flash cards
should obey oral instructions
should participate in classroom conversation
practice of writing activities needed
hobbies related points
collect pictures of various objects
participate in english activities happily
collects various writing material
shows enthusiasm in english
listen english news .
tries to understand english conversation
participate helpfully in group activities
asks questions orally about content
reads numbers upto 100 and more
can tell date and time


वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - गणित )


⭕विशेष उल्लेखनीय नोंदी :-
भौमितिक आकार ओळखतो .
वस्तूंचे पृष्टभाग सांगतो .
मापन वजन  संकल्पना स्पष्ट आहेत .
संख्यांचे मापन व लेखन करतो .
एकक व दशक रुपात संख्या वाचतो .
बेरीज हातच्याची उदाहरणे सोडवतो .
वजाबाकी हतच्याची उदाहरणे सोडवतो .
शून्याची संकल्पना स्पष्ट आहे .
२ ते १० पर्यंतच्या पाढ्याचे वाचन व लेखन करतो .
बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो .

⭕ सुधारणा  आवश्यक नोंदी :-
भौमितिक आकारांच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
वजन मापे / चलनी नोटा व नाणी यांची ओळख गरजेची .
संख्या वाचन / लेखनाचा सराव आवश्यक .
संख्याचे एकक /दशक रुपात वाचन /लेखन सराव आवश्यक.
बेरजेतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
वजाबाकीतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे.
शून्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
शाब्दिक उदाहरणांची मांडणी करताना गोंधळतो .
शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
पाढे  लेखन वाचनाचा सराव आवश्यक.



⭕आवड /छंद विषयक नोंदी :-
भौमितिक आकाराची नक्षी काढण्याची आवड आहे .
वस्तूचे पृष्ठभाग रंगवतो .
संख्याविषयक खेळ / भेंड्या इ. भाग घेतो .
दशकाचे गठ्ठे तयार करतो .
गणिती कोडे सोडवतो .
गणिताधारित गाणी म्हणतो .
शाब्दिक उदाहरणे स्वतःच तयार करतो .
मित्रांना गणिती क्रियासंदर्भात  मार्गदर्शन करतो.  

⭕ वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री -मराठी )


⭕विशेष उल्लेखनीय नोंदी

विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे देतो .
आत्मविश्वासाने आपले मत प्रकट करतो .
सूचना ऐकून सुचनेप्रमाणे कृती करतो.
हस्ताक्षर बरे / चांगले/ उत्तम / उत्कृष्ट आहे.
योग्य स्वराघातासह प्रकट वाचन करतो.
लेखनात गती आहे.
स्वयं लेखन करतो.
कृतियुक्त कविता गायन करतो .
नाट्यिकरणात सहभाग घेतो .
सुविचार बोधकथा कथन करतो .

⭕सुधारात्मक नोंदी

चित्रवाचनात सुधारणा अपेक्षित.
हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .
उच्चारात स्पष्टता आवश्यक.
वाचनात गती आवश्यक.
गटकार्य करतांना सहकार्य करणे आवश्यक.
कथाकथन करतांना आत्मविश्वास आवश्यक .
जोडाक्षर वाचन  लेखनाचा सराव आवश्यक.
पूरक साहित्य (वर्तमानपत्रे , मासिके , इ. ) वाचन आवश्यक.
आभ्यासासाठी बैठक योग्य असणे आवश्यक .
हस्ताक्षर सराव आवश्यक .
आवड छंद विषयक नोंदी
कविता गायनाची आवड आहे .
चित्रसंग्रह करण्याची आवड आहे .
लेखक / कवी यांच्याविषयी आवडीने बोलतो .
जाहिरातींचा आशय समजून घेतो .
शब्दांच्या भेंड्या उपक्रमात आवडीने भाग घेतो .
आत्मविश्वासाने वर्गासमोर मत प्रकट करतो .
शब्दकोडी सोडविण्याची आवड आहे .
कथाकथन करण्याची आवड आहे .


⭕वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री -ENGLISH)

special observational
sings rhymes after teacher
sings and act
listen carefully and read after teacher
communicate in simple english
try to identify pictures
try to read alphabets
try to read words
try to write alphabets
try to solve language exercise
try to write words and sentence
improvement related
singing of rhymes should be improvement
actions should be done properly
peractice of alphabets reading is must
practice of reading words needs
practice of picture reading is needs
reading of calender should be improved
time reading practice needed
practice of language games needed
practice of writing is needed
practice of strokes is must
Hobbies and interests
has hobby of singing nursary rhymes
shows interest in calender reading
shows interest in singing rhymes
shows interest in writing
shows interest in conversations
has hobby of collecting stamps
has hobby of collecting pictures
has hobby of writing objects collection
has hobby of collecting number shapes
has hobby of various models


🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री - गणित )



⭕विशेष उल्लेखनीय नोंदी

संख्या वाचन करतो .
भौमितिक आकृत्या प्रमाणबद्धरित्या काढतो .
बेरजेचा संबोध स्पष्ट आहे.
वजाबाकीचा,संबोध स्पष्ट आहे .
गुणाकाराची उदाहरणे सोडवतो .
शाब्दिक उदाहरणे सोडवतो .
पाढे वाचन लेखन करतो .
पाढ्यांच्या सहाय्याने  गुणाकार करतो .
 हस्ताक्षर बरे/चांगले / उत्तम /उत्कृष्ठ आहे .


⭕सुधारणा आवश्यक नोंदी

संख्यांचे वाचन सराव आवश्यक .
संख्यालेखन काळजीपूर्वक करणे गरजेचे .
आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक .
बेरीज क्रियेचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
बजाबाकिचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
शाब्दिक उदाहरणांचे मांडणी सराव आवश्यक .
गुणाकार संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
पाढे  वाचन- लेखनाचा सराव आवश्यक .
शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
हस्ताक्षर सुधारणा आवश्यक.

⭕ आवड व छंद विषयक नोंदी
नाणी व नोटा जमा करण्याची आवड आहे .
विविध प्रकारची तिकिटे जमा करतो .
विविध प्रकारच्या बिलांची बेरीज तपासतो .
भौमितिक आकारांचे योग्य रेखाटन करतो .
पाढे पाठांतराची आवड आहे .
तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे .
अंकांच्या वाचन लेखनाची आवड आहे .
भौमितिक आकाराची  नक्षी तयार करतो .
शाब्दिक उदाहरणे स्वतः तयार करतो .
मित्रांना गणिती कोडी विचारतो . .


🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री - परिसर अभ्यास )


⭕विशेष उल्लेखनीय नोंदी

घटनेमागील वैज्ञानिक  कारणे  शोधण्याचा प्रयत्न करतो .
वैज्ञानिक  संकल्पना स्पष्ट होतात
व्याख्या पाठांतर चांगले आहे
विज्ञानाशी  संबंधित कोडी सोडवितो      
विज्ञानविषयक प्रश्नांची निर्मिती करतो .
वैज्ञानिक  दृष्टीकोन बर्‍यापैकी विकसित झालेला आहे
गटात अभ्यास करतो
घटनांची नोंद घेतो
गृहपाठ / स्वाध्याय आवडीने सोडवतो
पृथ्वी व माणूस सहसंबंध सांगतो
मानवांच्या गरजा समजून घेतो
घर व शाळा यांचा सहसंबंध स्पष्ट आहे
पृथ्वी व गृहमालेच्या संकल्पना स्पष्ट आहेत
नकाशातिल दिशा ओळखतो
जिल्ह्यातिल भुरूपांची माहिती सांगतो
जिल्ह्यातील लोकजीवनाविषयी माहिती सांगतो
परिसर भेटी  देउन माहिती जमा करतो


⭕सुधारणात्मक नोंदी

वैज्ञानिक  संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
व्याख्या पाठांतर आवश्यक
गट सहकार्य आवश्यक
गृहपाठ वेळेत पुर्ण करणे आवश्यक
प्रयोगामध्ये आवड निर्माण होणे आवश्यक
वैज्ञानिक  दृष्टिकोन निर्मान होणे गरजेचे
वस्तुनिष्ट प्रश्नांचा सराव आवश्यक
लेखनाचा सराव आवश्यक
प्रयोगांमध्ये सफाईदारपणा आवश्यक
विज्ञानविषयक पुरक वाचन आवश्यक
मानवाच्या विकासाची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक
मानवाच्या गरजाविषयक संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
गाव व कुटुंबाबाबत जागरूकता आवश्यक
पृथ्वी व ग्रहमालेच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
बोलताना आत्मविश्वास आवश्यक
कृतींमध्ये सुधारणा आवश्यक
उपक्रमात सहभाग आवश्यक
लोकजीवनाविषयक आस्था आवश्यक
परिसरभेटीत जागरूकता आवश्यक

⭕आवड- छंद विषयक नोंदी

विज्ञान  विषयाची आवड आहे
शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याची आवड आहे
प्रयोग मन लावून  करतो
आकृत्या रेखाटनाची  आवड आहे
विज्ञान विषयक चित्रे व माहितीचा संग्रह करतो
विज्ञानविषयक माहिती  करतो
वैज्ञानिक सत्यांचा स्वीकार करतो
परिसर अभ्यासाची आवड आहे
विज्ञानाबद्दल आदर बाळगतो
वैज्ञानिक घटना संदर्भात प्रश्न विचारतो
ग्रह गोलाच्या प्रतिकृती बनवतो
भूरुपांचे चार्ट बनवतो
उठावदर्शक नकाशे तयार करतो
परिसर भेटीच्या नोंदी करण्याची आवड आहे
भौगोलिक माहिती संकलित करतो
इतिहासातील प्रसंग कथन करतो
परिसर भेटीची आवड आहे
सोपे नकाशे तयार करतो
नकाशावाचन करण्याची आवड आहे

🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥

🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ४ थी -मराठी )

⭕विशेष उल्लेखनीय नोंदी
लक्षपूर्वक श्रावण करतो
ऐकताना अवधान टिकवून ठेवतो
दृक श्राव्य साधनांचे लक्षपूर्वक श्रावण करतो
कविता सुस्वर गायन करतो
गीतांचे प्रभावी सादरीकरण करतो
ऐकलेली  माहिती प्रभावीपणे सांगतो
परिसरातील मजकूर आकलनासह वाचन करतो
स्पष्ट उच्चारासह प्रकट वाचन करतो
हस्तलिखित मजकुराचे वाचन करतो
वाचन करताना  ठिकाणी विराम येतो
 योग्य गतीने वळणदार लेखन करतो
शब्द , वाक्ये आठवून लेखन करतो
सूचनेनुसार शब्द वाक्ये लिहितो
प्रश्नांची उत्तरे लेखन  करतो
म्हणी , वाक्प्रचारांचा  लेखनात वापर करतो

⭕सुधारणात्मक नोंदी

सूचनांचा क्रम  लक्षात राहत नाही
 घटना सांगताना क्रम विसरतो
सहशालेय उपक्रमात क्रम विसरतो
संभाषणात सहभाग आवश्यक
उच्चारात स्पष्टता आवश्यक
बोलताना योग्य गती आवश्यक
आत्मविश्वासपूर्वक बोलणे आवश्यक
वाचतांना योग्य ठिकाणी विराम घेणे आवश्यक
वाचनस्पर्धा  सहभाग आवश्यक
संदर्भसाहित्य वापर आवश्यक

⭕आवड छंद विषयक नोंदी

सुविचारांचा संग्रह करतो
स्वतःची  कामे स्वतः करतो
निसर्गाची आवड आहे
अवांतर वाचनाची  आवड आहे
वाचनीय  संग्रह करतो
अक्षरलेखनाची आवड आहे
राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो
सराव उताऱ्यांचे आकलन होते
बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो
वाचन पाठांचा संग्रह करतो
बोधकथा इ. संकलन करतो



 ENGLISH)
spacial observational points
sings clearly
takes part in conversation
takes parts in activities
listens carefully
reads neatly
pronunciation of words is clear
understanding of word cards is good
understanding of pictures is good
handwriting is good/better/best
speaks confidently
improvement related
should listen carefully
should speak confidently
should sing properly
pronunciation of word should be improved
pronunciation of texts should be improved
singing skill needs improvement
rapid reading activities should be practiced
handwriting in single ruled needs improvements
drawing skill must be improved
hobbies and interests
has hobby of colouring objects
has hobby of making models
has hobby of good handwriting
has hobby of writing
likes singing
likes acting
likes colourful pictures
has hobby of collecting pictures
has hobby of debating



🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी -गणित)


⭕विशेष उल्लेखनीय बाबी

1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट आहेत
2स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सांगतो
3 भौमितिक आकाराचे रेखाटन करतो
4 आकडेमोड कौशल्य चांगले आहे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
6 पाढ्यांचे वाचन व लेखन करतो
7 मापन कौशल्य विकसित झालेले आहेत
8 चलन व्यवस्थित हाताळतो
9 कॅलेंडर वाचन करून प्रश्न सोडवतो


⭕सुधारणा आवश्यक नोंदी

1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
2 स्थानिक किंमत व् दर्शनी किंमत सराव आवश्यक
3 भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
4 आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
6 पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
7 मापन कौशल्य सराव आवश्यक
8 चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक
9 कॅलेंडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक .


⭕आवड / छंद विषयक नोंदी

1 संख्याविषयक संकल्पनांची आवड आहे
2 भौमितिक आकारांचे रेखाटन करण्याची आवड आहे
3 पैशांचे व्यवहार करण्याची आवड आहे
4 गणिते सोडवण्याची व इतरांना मदत करण्याची आवड आहे
5 गणिती कोडी सोडविण्याची आवड आहे
6 पाढ्यांचे लेखन वाचन करण्याची आवड आहे .


🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 वर्णनात्मक नोंदी -परिसर अभ्यास भाग 1)

⭕विशेष उल्लेखनीय नोंदी

1 अवयावांची रचना व कार्य सांगतो
2 सुसूत्रतेचे महत्त्व सांगतो
3 अन्न या गरजेविषयी सांगतो
4 मानवाच्या गरजा जाणतो
5 नैसर्गिक साधनसंपत्तिचे महत्त्व जाणतो
6 पदार्थांच्या अवस्था जाणतो
7 घटनामागील वैदन्यानिक सत्याचा शोध घेतो
8 वैदन्यानिक दृष्टिकोनातून चिकित्सक विचार करतो
9 प्रयोगांच्या नोंदी काळजीपुर्वक करतो
10 विविध उपक्रमात सहभाग घेतो


⭕सुधारणात्मक नोंदी

1 मानवी शरीरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
2 पाठांतरात सुधारणा आवश्यक
3 प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
4 मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
5 वैदन्यानिक उपक्रमात सहभाग आवश्यक
6 वैदन्यानिक आवड निर्माण होणे आवश्यक
7 सयं अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
8 प्रयोग नोंदित सुधारणा आवश्यक
9 पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
10 नैसर्गिक साधनाबाबत जागरूकता आवश्यक

⭕आवड व छंद विषयक नोंदी

1 प्रयोग करण्याची आवड आहे
2 आकृत्या रेखाटण्याची आवड आहे
3 प्रतिकृति तयार करतो
4 वैदन्यानिक कोडी सोडवतो
5 विद्न्यानविषयक घडामोडीची माहिती मिळवितो
6 यंत्राची आवड आहे
7 विदन्यान विषयक चर्चेत सहभाग घेतो
8 घटकाविषयी अधिक माहिती मिळवितो
9 प्रश्न विचारुन माहिती मिलवितो
10 विद्न्यान विषयक उपक्रमात सहभाग घेतो
11 घटनांची वस्तुनिष्ट नोंद घेतो
12 रासायनिक पदार्थांचे गुणधर्म शोधतो


🚩🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी-परिसर अभ्यास भाग 2)

⭕विशेष उल्लेखनीय नोंदी

1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो
2 शिवचरित्र समजून घेतो
3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो
4 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
5 प्रसंगाच्या नाटयीकरणात भाग घेतो
6 कुटुंब व् समाज परस्परावलंबित्व समजून घेतो
7 ग्रहमाला व् पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
8 महाराष्ट्राचा भूगोल समजून घेतो
9 महाराष्ट्राचे लोकजीवन समजून घेतो
10 सामाजिक शास्त्र या विषयाचे  आदरपूर्वक अध्ययन करतो

⭕सुधारणात्मक नोंदी

1 मध्ययुगीन कालखंडाची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
2 शिवचरित्र संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
3 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
4 प्रसंगाच्या नाटयी करणात सहभाग आवश्यक
5 नागरी संस्थांचे महत्त्व व कार्यपद्धती स्पष्ट होणे गरजेचे
6 कुटुंब व समाज परस्परावलंबित्व स्पष्ट होणे गरजेचे
7 ग्रहमाला व पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
8 महाराष्ट्राचा भूगोल संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
9 महाराष्ट्राचे लोकजीवन संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
10 सामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन आवश्यक

⭕आवड / छंद विषयक नोंदी

1 इतिहास श्रवण करण्याची आवड आहे
2 नाटयीकरणाची आवड आहे
3 आकृत्या रेखाटणाची आवड आहे
4 चित्र संग्रहाची आवड आहे
5 परिसर भेट.🎯

🎪⚠⚠🚏💈🏮🔰♨⚠🚡🔰🔰🔰

Tuesday 16 February 2016

🌹कोणत्याही 2 अंकी संख्येची  वर्ग काढण्याची सोपी पद्धत🌹
उदा,
63 चा वर्ग
एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग=9
एकक व दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार =18
त्यांची दुपट्ट =36
दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग =36
63=  3969

63 चा वर्ग =39 ( दशक चा वर्ग+दशक च्या वर्गातील उरलेला 1 अंक 36+3 )6(दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग मधील एककचा अंक)9(एकक चा वर्ग)

63 चा वर्ग  =
3969
अश्याप्रकारे आपणास 11 ते 99 पर्यंतच्या अंकांचे वर्ग काढता येतात

🙏🏻धन्यवाद🙏🏻
🌹छाया मुंडकर /मुंडलोड🌹
जि. प. के. प्रा. शा. कन्या वसमत

Monday 30 November 2015

मार्क्स

Vachla pahije asa Lekh..

 अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख:  

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक, 
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली.... 
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?" 
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले. 
'अ = ब' 
व 
'ब = क' 
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर' 
व 
'स्कॉलर = मार्क'. 
याचा 
अर्थ 'मी = मार्क'. 

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे. 

हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'. 
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा 
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.

जरा विरोधाभास पाहूया...

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे. 

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'. 
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
 हे ऐकल्यावर तिलाही हसू आले. 

काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या 
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित 
केल्यामुळे त्या क्षमतांना 
'किंमत' दिली जात नाही. 

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया. 

'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..

हा आत्मविश्वास मुलांना द्या!

आवडली तर नक्की शेयर करा...!

तुमचा हा संदेश कीत्येक पालक आणी विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...